राजकारणहोम

“तारीख पे तारीख तो होनेवाली है” सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया!

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “ तारीख पे तारीख तो होनेवाली है. तो त्यांचा अधिकार आहे. न्यायव्यवस्थेला कोणी, तुम्ही-आम्ही विचारू शकतो का? आपल्याकडे त्यांना(शिवसेनेला) जो अधिकार आहे तो अधिकार ते वापरणार. आम्हीपण बघतोय सारख्या तारखा सुरू आहेत. जवळपास सहा महिने झाले तारखा सुरू आहेत. आता पुन्हा फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे.”
“ शेवटी वकीलाच्या मार्फत ती केस मांडणं, हे काम शिवसेना करते आहे आणि आपण हे सगळं पाहतोय. तिथे आपण काय करणार? तो त्यांचा अधिकार आहे. तो त्यांना दिला गेलेला आहे. कायदा, घटनेना अशा सगळ्यांनी मिळून त्यांना दिलेला आहे.”
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरूद्ध शिंदे हा संघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. याआधीही अनेकदा तारीख पे तारीखचा अनुभव आला होता. त्यानंतर आज काहीतरी ठोस निर्णय दिला जाईल असं वाटलं होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीपासून सलग घेतली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button