महाराष्ट्र

“माझी माती, माझी थाळी” अभियानांतर्गत ‘पालघर थाळी’चा शुभारंभ

पालघर : देशातील नागरिकांवर दक्षिणात्य, उत्तरे मधील तसेच पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीच्या पगडा असताना स्थानीय पातळीवर उपलब्ध होणाऱ्या हंगामी खाद्यपदार्थांचा वापर दैनंदिन आहारामध्ये करून शुद्ध, सात्विक व पौष्टिक आहाराचा वापर करण्यावर भर देणारा “माझी माती, माझी थाळी” (अर्थात “मेरी मिट्टी, मेरी थाली”) अभिनव प्रकल्पाचा शुभारंभ गालथरे (वाडा) येथील इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज च्या माध्यमातून स्थानीय अन्न दिन (नेटिव्ह फूड डे) चे निमित्त साधून करण्यात आला.

या प्रसंगी पालघर थाळी चे लॉन्चिंग करण्यात आले. जैवविविधता, सांस्कृतिक वारसा व पारंपरिक खाद्य ज्ञान राखणाऱ्या या खाद्य पद्धतीचा प्रसार तसेच विविध पातळीवर जागृती करून दैनंदिन आहारामध्ये स्थानीय पातळीवर उपलब्ध पौष्टिक घटकांचा समावेश करणे व शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान भोजनामध्ये या बाबी समाविष्ट करण्यासाठी या प्रकल्पातून प्रयत्न केले जाणार आहेत. स्थानीय पदार्थांनी तयार केलेले अन्नपदार्थ हे शाश्वत ठरत असून त्यामुळे खूप भागणे, पोषण सुरक्षा प्राप्त होणे, पारंपरिक हंगामी खाद्यपदार्थांचा उपलब्धतेनुसार वापर करून खाद्यपदार्थ सुरक्षित ठरत आहेत. पारंपरिक पदार्थ हे औषध, आठवण आणि भौगोलिक ओळख ठरत आहेत.


फायदे :

  • आरोग्य : हंगामी, हवामानाला अनुकूल, पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपे.
  • शाश्वतता : कमी संसाधनांचा वापर करणाऱ्या शेतीला प्रोत्साहन देतात आणि अन्न वाहतुकीचे अंतर कमी करतात.
  • सांस्कृतिक सातत्य : परंपरा, विधी आणि मौखिक वारसा जतन करतात.
  • आर्थिक सक्षमीकरण : लहान शेतकरी, महिला-नेतृत्वाखालील उद्योग आणि स्थानिक अन्न प्रणालींना चालना देतात.
  • हवामान कृती : कृषी-पर्यावरणशास्त्र आणि लहान पुरवठा साखळ्यांद्वारे लवचिकता निर्माण करतात.
  • चव आणि अस्सलपणा : स्थानिक घटकांसह आणि समृद्ध चवींसह पिढ्यानपिढ्या परिपूर्ण केलेले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button