महाराष्ट्र

महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची..! साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे मागणी

सातारा : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात ९९ वे अखिल भरतोय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर काही महत्वाच्या मागण्या केल्या.

आज साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हिंदीची सक्ती मागे घेण्याची मागणी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले, “ महाराष्ट्रावर केवळ मराठीचाच अधिकार आहे. महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती झाली पाहिजे. माय मराठीची अवहेलना होत असताना हिंदी भाषेची सक्ती मागे घेतली पाहिजे. प्रत्येक गावातील ग्रंथालये समृद्ध झाली पाहिजेत. मराठीला तिच्या हक्काचा वाटा मिळालाच पाहिजे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button