गुन्हेमहाराष्ट्र

मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार

पुणे : मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नाही. नशीब बलवत्तर म्हणून थिगळे या घटनेत थोडक्यात बचावले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय. संपवतोच तुला”, असं म्हणत पिस्तुल रोखुन एकाने पैशाची मागणी करत समीर थिगळे यांना धमकी दिली. त्यानंतर या गुंडांनी समीर थिगळे यांच्या छातीवर गोळी झाडली. पण सुदैवाने यावेळी बंदुकीतून गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर या गुंडांना हवेत गोळीबार करून थिगळे यांना धमकावले आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
या प्रकरणी राजगुरुनगर पोलिसांनी आरोपी मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. मात्र समीर थिगळे यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबाराची घटना घडल्याने आसपासच्या परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button