मनोरंजन 

रजनीकांतचा फोटो किंवा आवाज वापरत असाल तर सावधान.! भोगावा लागू शकतो तुरुंगवास

साऊथ स्टार रजनीकांत यांचे वकील एस इलामभारती यांनी जाहीर इशारा दिला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे वकील एस इलामभारती यांनी अभिनेत्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सेलिब्रिटींच्या अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. खरं तर, अभिनेते रजनीकांत यांनी स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करून त्यांचे नाव, प्रतिमा आणि आवाज वापरणार्‍यांविरोधात नोटीस जारी केली आहे.

रजनीकांत म्हणतात की याद्वारे ते पैसे कमवतात किंवा त्यांच्या खात्यावर फॉलोअर्स वाढवतात. नोटीसमध्ये असे म्हटले आहे की ‘रजनीकांतला सेलिब्रिटीचा दर्जा आहे आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंवर प्रसिद्धी किंवा सेलिब्रिटी अधिकार आहेत. त्याचे नाव, आवाज, प्रतिमा इत्यादींच्या व्यावसायिक वापरावर फक्त अभिनेत्याचे नियंत्रण असते. नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, “अनेक प्लॅटफॉर्म आणि उत्पादन निर्माते रजनीकांत यांचे नाव, आवाज, छायाचित्र, व्यंगचित्र प्रतिमा, कलात्मक प्रतिमा, एआय जनरेट केलेली प्रतिमा इत्यादींचा गैरवापर करत आहेत. रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना मिळावा यासाठी ते त्यांच्या व्यासपीठासाठी हे करत आहेत. याद्वारे ते लोकांना त्यांची उत्पादने खरेदी करण्यास किंवा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यास प्रवृत्त करतात. रजनीकांत यांचे नाव, प्रतिमा इत्यादींचा विनापरवाना वापर करून जनतेमध्ये संभ्रम आणि फसवणूक होण्याची शक्यता आहे, जे अजिबात योग्य नाही, असे नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button