तुनिषा-शिझान प्रकरणात न्यायालयाने पोलीसांनाच केली विचारणा

• न्यायालयाने नेमकं काय सांगितलं आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत शिझान खान प्रकरणाला नवं वळण लागताना दिसून येत आहे. सुनावणीत काल उच्च न्यायालयाने या प्रकरणात तपास करत असलेल्या पोलिसांना तपास योग्य दिशेने सुरु आहे का? तुनिषाच्या आईच्या आरोपांवरुन किंवा जबाबातून कोणतंही ठाम हेतू साध्य होत नाहीय.
त्यामुळे शिझान खानने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट पुरावे आहेत का ? नसतील तर त्या दिशेने तपास सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे तसेच पृथ्वीराज चव्हाण खंडपीठाने सरकारी वकील असलेल्या अरुणा पै यांच्याकडे विचारणा केली. सोबतचे न्यायालयाने शिझान खानने केलेल्या अंतरिम जामिनावरील अर्जावर त्वरित दिलासा देण्यास नकार दिला आहे.
परंतु आता मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अलीबाबा;दास्तान-ए-काबुल’ मध्ये मुख्य भूमिका अभिनेता शिजान खानने साकारली होती. भिनेत्रीने शिजान खानच्या मेकअपरुममध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं होतं. यांनतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. त्याचवेळी अभिनेत्रीच्या आईने शिजानवर आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आरोप करत त्याला अटक करण्याची मागणी केली होती. त्यांनतर पोलिसांनी अभिनेत्याला कस्टडीत घेतलं होतं.



