‘रंग माझा वेगळा’ चा नवा ट्रॅक पाहून प्रेक्षकांनी मालिका केली ट्रोल

छोट्या पडद्यावरच्या मालिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. पण अनेकदा मालिका ट्रोलही होतात. अनेकदा मालिकेतील बदल, मालिकेतील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना आवडत नाहीत आणि मग मालिका ट्रोल होतात. सध्या अशीच एक मालिका ट्रोल होतेय. रंग माझा वेगळा मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत.
रंग माझा वेगळा मालिकेत आशुतोष गोखले आणि रेशमा शिंदे, हर्षदा खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेत आशुतोष कार्तिक इनामदारची भूमिका साकारतो रेशमा शिंदे दीपाची तर हर्षदा खानविलकर सौंदर्याची. रंग माझा वेगळा मालिकेत नुकताच दीपा आणि कार्तिकचा लग्नसोहळा थाटात पार पडला. दीपा आणि कार्तिकचं लग्न झाल्यावर दोघांचा सुखाचा संसार सुरु होईल असं वाटतं असतानाच मालिकेनं वगळं वळणं घेतलं.
दीपानंतर आता कार्तिकचे पुन्हा एखदा रंग बदलताना दिसणार आहे. कार्तिक बाप होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट श्वेता तयार करते हे सत्य सर्वांसमोर येतं. तर कार्तिक आणि दीपाच्या संसारात काड्या घालणारा आयेशाही जेलमध्ये जाते. राधा आई देखील तिच्या चुकांची कबुली देते. मालिकेत हा मोठा ड्रामा नुकताच संपला. ड्रामा संपवून कार्तिक आणि दीपा लग्न करतात. मात्र मालिकेत पुन्हा एकदा ट्विस्ट आणत कथानकात मोठा बदल करण्यात आला आहे.
नुकताच मालिकेच्या एक प्रोमो समोर आला आहे. यात दीपाची मैत्रीण साक्षी हॉस्पि़टलमध्ये दीपाच्या मांडीवर अखेरचा श्वास घेताना दिसतेय. दीपाला साक्षनं तिच्या पडत्या काळात साथ दिलेली असते. कार्तिकला साक्षी दीपाचा पाठलाग करताना पाहते आणि तू तिच्यावर संशय घेतोयस सांगून त्याच्याशी भांडते. दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची होते. दीपावर तू अजूनही संशय घेतोयस असं म्हणत दीपासमोर कार्तिकला खडसावते.



