जीवनशैली

नखं खाण्याच्या सवयीमुळे शरीरात होऊ शकतात गंभीर आजार

आरोग्य : नख खायची सवय असलेल्यांसाठी ही बातमी आहे. नखं खायची सवय आहे तर सावधान. कारण असं करुन गंभीर आजारांना आमंत्रण देत आहात. नखं तोंडाने काढण्याच्या सवयीने पॅरोनिचियाचे संक्रमण होऊ शकते. डॉक्टर सांगतात की, जर संसर्ग बराच काळ टिकून राहिला आणि त्यावर उपचार न केल्यास पॅरोनिचियामुळे पू आणि सूज येते. यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि ताप आणि चक्कर येणे देखील होऊ शकते. पॅरोनिचिया उपचारानंतर बरा होतो. मात्र अनेक लोकांमध्ये ते पुन्हा येते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की गंभीर आणि जुनाट पॅरोनीचिया संसर्ग बहुतेकदा मधुमेह असलेल्या लोकांना प्रभावित करतो.

पॅरोनिचियाची लक्षणे :

१. पॅरोनिचीयाचे लक्षणे     २. नखाच्या आजुबाजूची त्वचा लाल होणे

३. त्वचा नाजूक होणे     ४. पू असलेली फोड येणे     ५. नखाचा आकार, रंगामध्ये बदल जाणवणे

६. नखं तुटणे     ७. नखाच्या आजुबाजुला दुखणे     ८. जास्त ताप येणे आणि चक्कर येणे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पॅरोनिचियावर वेळीच उपचार न केल्यास त्याचा नखावर परिणाम होतो आणि नखं असामान्यपणे वाढायला सुरुवात होते. नखाच्या रंगामध्येही बदल होतो. नखं पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची होऊ शकतात. एवढेच नाही तर, नखं आपोआप पडूही शकतात.

नखांच्या इंन्फेक्शन कसे रोखावे

१. हात धुतल्यानंतर त्यांना मॉईश्चराईज करावे     २. नख ही नेलकटरनेट काढावीत

३. तोंडाने नखं काढू नयेत.     ४. नखं स्वच्छ आणि सुकी ठेवावीत.

५. उगाच वारंवार हात धुवू नयेत     ६. नखं एकदम न वाढवता मध्यम ठेवावीत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button