क्रिडाविश्व

तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघात “बॉर्डर गावसकर कसोटी” मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतानं २-० ने आघाडी घेतली आहे. इंदौरमध्ये तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नर याने निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आपण कधीपर्यंत खेळायचं हे आपली आवड सांगत असते. पण काही जणांच्या मते मी माझी शेवटची कसोटी खेळलो आहे. सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरनं आपल्या कसोटी करिअरबाबत वक्तव्य केलं आहे. “निवड समितीने कसोटी करिअर संपवण्याचा निर्णय घेतला असेल. तर २०२४ पर्यंत मी मर्यादीत षटकांचा सामना खेळू इच्छित आहे.”, असंही त्याने पुढे सांगितलं.

काही क्रीडा जाणकारांच्या मते, वॉर्नरनं आपला शेवटचा कसोटी सामना दिल्लीत खेळला. दुसरीकडे वॉर्नरनं स्वत:च सांगितलं की, निवड समिती त्याला कसोटीत खेळवू इच्छित नाही.त्यामुळे आता त्याच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. कोपराच्या दुखापतीमुळे डेविड वॉर्नर बॉर्डर गावसकर मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात खेळणार नाही. दुखापतीनंतर वॉर्नर मायदेशी परतला आहे. वॉर्नरने भारताविरुद्ध खेळलेल्या तीन डावात १,१० आणि १५ धावा केल्या आहेत. दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत डोक्याला जबर मार लागल्याने फलंदाजी करू शकला नव्हता.

डावखुऱ्या डेविड वॉर्नरला अशेज दौऱ्यात खेळण्यास संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. “मी कायम एकच गोष्ट सांगितली आहे, मी २०२४ पर्यंत खेळू इच्छित आहे. पण निवड समितीली मी कसोटीत खेळणं योग्य वाटत नसेल तर मी काहीच करू शकत नाही. मी व्हाईट चेंडूने खेळण्याचा प्रयत्न करेन.”

“माझ्याकडे अजूनही १२ महिने आहेत. या महिन्यात मला खूप क्रिकेट खेळायचं आहे. मला धावा करायच्या आहेत. मी टीमला सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेन. पण जेव्हा तुम्ही ३६ वर्षांचे किंवा ३७ वर्षांचे होता तेव्हा टीकाकारांच्या रडारवर येता. माजी खेळाडूंच्या बाबतीतही असंच झालं आहे.”, असंही त्याने पुढे सांगितलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button