उद्धव ठाकरेंना सेनाभवन ही हातातून जाण्याची भीती; खेळली नवी खेळी

निवडणूक आयोगाकडून विरोधात निकाल येण्याची शक्यता वाटल्याने काही दिवसांपूर्वीच नवा भाडेकरार केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना भवनाबाबत हा करार झालेला असला तरी आम्ही शिवसेना भवनवर दावा सांगणार नाही, कारण आमच्यासाठी ते मंदीर आहे, असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात ठाकरेंची बाजू मांडली. यामध्ये त्यांनी शिवसेना पक्ष शिंदेंकडे गेल्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावला जाईल आणि त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, अशी भीती व्यक्त केली.
यावर न्यायालयाने दोन आठवडे या आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. बँक खात्याचीही भीती सगळं काही हातातून गेल्यानंतर आता ठाकरे गटाला पक्षनिधीही जायची भीती आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात हाच युक्तीवाद मांडला आहे. त्यांनी आधीच विधिमंडळातलं पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं आहे, आता ते बँक अकाऊंट आणि सगळं ताब्यात घेतील, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली, सुप्रीम कोर्टाने सिब्बल यांची ही मागणी मात्र मान्य केली नाही.


