मनोरंजन 

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रम मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क !

लहानांपासून अगदी म्हाताऱ्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच काही दिवसाआधी गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये कपडे बदलताना चोरुन चित्रीकरण करण्यात आले. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असताना गौतमी पाटीलची लोकप्रियता वाढता असताना तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गौतमी पाटीलकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान गौतमी केवळ इंटरनेटवरच नाही तर डान्सच्या जगातही एक प्रसिद्ध नाव आहे.

 

दरम्यान गौतमी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना आहे. ती अनेक कार्यक्रमांमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स देत असते. राजकीय कार्यक्रम असो किंवा वाढदिवसाची पार्टी गौतमीला आमंत्रणं येऊ लागली आहे. गौतमीच्या एका महिन्यातील सगळ्या तारख्या फुल्ल होऊ लागल्या आहेत. कार्यक्रमांच्या घेऊ तितक्या सुपाऱ्या कमी आहे, अशी अवस्था गौतमीची झाली आहे. यामुळेच ती तिच्या प्रत्येक परफॉर्मन्ससाठी भरमसाठ रक्कम घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका डान्स परफॉर्मन्ससाठी १ ते २ लाख रुपये घेते आणि तिची टीम दरमहा ३०-३५ लाख रुपये सहज कमावते.

कोल्हापूरच्या गौतमीचे वय २६ वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून तिने अनेक वर्षांपूर्वी डान्स म्हणून करिअरला सुरुवात केली होती. गौतमी पाटील ही लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. गौतमीवर झालेल्या आरोपानंतर तिनं तिच्या डान्समध्ये आणि स्वत:मध्ये बरेच बदल केले. तिच्यावर कार्यक्रमांवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र दिवसेंदिवस गौतमीची क्रेझ वाढतच असल्याचं चित्र दिसतंय. गौतमी तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा ती तिच्या आईसोबत फोटो शेअर करताना दिसते. गौतमीचे माझ्यासोबतचे सुंदर बॉन्डिंग फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button