क्रिडाविश्व
IPL 2023 : आय़पीएल २०२३ मधील या ५ कर्णधारांवर बंदीची टांगती तलवार

मुंबई : आय़पीएल २०२३ मध्ये खेळणाऱ्या संघांपैकी अर्ध्या संघांच्या कर्णधारांवर बंदीची टांगती तलवार आहे. आणखी दोन चुका केल्यास त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते.
यामध्ये हार्दिक पांड्या, फाफ डुप्लेसिस, संजू सॅमसन, केएल राहुल यांचा समावेश आहे. त्यांचे संघ आय़पीएलमध्ये चांगली कामगिरी करत असतानाच कर्णधारांना बंदीचा सामना करावा लागू शकतो. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, एका सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादव, लखनऊ सुपर जायंट्सचा केएल राहुल या कर्णधारांना धीम्या गतीने षटके टाकल्यानं १२ लाख रुपये दंड भरावा लागलाय धीम्या गतीने कर्णधारांना करण्यात आलेला दंड हा फक्त १२ लाख रुपये नाही तर त्यांच्यासाठी इशारा आङे.
जर दोन वेळा हीच चूक झाल्यास कर्णधारावर बंदी घातली जाते. त्यामुळे आता कर्णधारांनी पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सर्वच संघांनी पहिल्यांदाच ही चूक केल्यानं फक्त कर्णधारांना दंड झाला. निश्चित वेळेत षटके न टाकल्यास कर्णधारांना दंड केला जातो. जर पुन्हा संघांकडून अशीच चूक झाली तर संपूर्ण संघाला दंड केला जातो आणि कर्णधाराचा दंड २४ लाख रुपये इतका तर संघातील खेळाडूंना सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के दंड केला जातो. तिसऱ्यांदा चूक झाल्यास कर्णधाराला ३० लाख रुपये दंड आणि एका सामन्यासाठी बंदी घातली जाते. तर प्लेइंग इलेव्हनमधील इतर दहा खेळाडूंना सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के रकमेचा दंड भरावा लागतो.



