मनोरंजन 

“लता दीनानाथ मंगेशकर २०२३” पुरस्कार जाहीर

मुंबई : मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे गेल्या ३३ वर्षांपासून संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. तर या वर्षीच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे .याशिवाय विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेक कलाकारांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नुकतंच दिवंगत गीतकार, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकानुसार या वर्षी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आलाय. तर चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील विशेष योगदानासाठी अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालन हिला विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.

येत्या २४ एप्रिल २०२३ रोजी प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा मुंबईतील सायन येथील श्री षण्मुखानंद हॉल इथे पार पडणार आहे.

विशेष वैयक्तिक पुरस्कार- पंकज उदास (भारतीय संगीत),
सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे ‘नियम व अटी लागू’
श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट- (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन – (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार – श्री.प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार- विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button