मनोरंजन 

भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार कोण ? घ्या जाणून…

यादी, 'या' अभिनेत्याला एका एपिसोडसाठी मिळतात 12 कोटी

मुंबई : टीव्ही हे मनोरंजनाचं लोकप्रिय माध्यम आहे. लोकांकडे स्मार्टफोन आले असले तरी भारतीय घरात टीव्ही पाहण्याचं प्रमाण मोठं आहे. एकेकाळी टीव्ही कलाकार व चित्रपट अभिनेते यांच्या मानधनात खूप तफावत होती.

टीव्ही कलाकारांना अगदी कमी मानधन मिळायचं. पण रिअॅलिटी शोमुळे आता ही परिस्थिती बदलली आहे. टीव्ही कलाकारही मालिकांसाठी महिन्याला कोट्यवधी रुपये मानधन मिळवतात. आज अशाच काही कलाकारांबद्दल व त्यांच्या मानधनाबद्दल जाणून घेणार आहोत.

टीव्हीवर सर्वाधिक मानधन घेणारे सेलिब्रिटी टीव्हीवर सर्वाधिक मानधन घेणारे बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. जे काही शो किंवा इतर कार्यक्रम होस्ट करतात. यामध्ये ‘कपिल शर्मा शो’साठी कपिल शर्मा, ‘लॉक अप’साठी कंगना रणौत, ‘कौन बनेगा करोडपती’साठी अमिताभ बच्चन आणि ‘कॉफी विथ करण’साठी करण जोहर यांचा समावेश आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार हे सर्व सेलिब्रिटी त्यांच्या संबंधित शोसाठी प्रति एपिसोड सुमारे १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम आकारतात.

त्यामुळे त्यांची एका शोसाठीची एकूण फी ही त्यांच्या अनेक टॉप चित्रपटातील कलाकारांपेक्षा जास्त असते. हेही शाहरूखनं कर्ज काढून घेतला होता ‘मन्नत’ बंगलो, पैसे फेडण्यातं गेलं उभं आयुष्य, किंमत जाणून व्हाल थक्कभारतीय टेलिव्हिजनमधील सर्वाधिक मानधन सुपरस्टार सलमान खान बिग बॉस हा लोकप्रिय रिअॅलिटी शो होस्ट करण्यासाठी खूप जास्त मानधन घेतो, असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी, अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की सलमान खान बिग बॉस १६ च्या संपूर्ण सीझनसाठी तब्बल १००० कोटी रुपये मानधन घेतोय. सलमानने स्वतः मुलाखतींमध्ये या आकडेवारीची खिल्ली उडवली असली तरी त्याने कधीही याबद्दल भाष्य केलं नाही.

‘सियासत’ आणि ‘टेलीचक्कर’ मधील रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांनुसार ते आकडे अतिशयोक्तीपूर्ण होते. नवीन सीझनसाठी सलमान दर आठवड्याला २५३ कोटी रुपये म्हणजेच प्रति एपिसोड १२.५० कोटी रुपये घेत असल्याची माहिती आहे. यानुसार, सलमान खान टेलिव्हिजनवर सर्वाधिक मानधन घेणारा भारतीय सेलिब्रिटी आहे. भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे टीव्ही कलाकार ‘बिग बॉस’साठी सलमान खानला मिळणाऱ्या मानधनाची तुलना टेलिव्हिजनवरील फिक्शन शोमधील कलाकारांच्या कमाईशी करणे कदाचित अयोग्य ठरेल. कारण दोन्ही कार्यक्रमांच्या शैली खूप वेगळ्या आहेत. दरम्यान, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही कलाकारांच्या यादीत रुपाली गांगुली सध्या पहिल्या स्थानावर आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, ‘अनुपमा’ स्टार रुपाली शोसाठी प्रति एपिसोड ३ लाख रुपये घेते. तर, हिना खान, रोनित रॉय आणि राम कपूर हे प्रति एपिसोड १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारे इतर महागडे कलाकार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button