महाराष्ट्र

महाराष्ट्रात मान्सून दाखल; मुंबईत पाऊस पण जोर नाही, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात

मुंबईः  महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन दोन आठवडे लोटल. मात्र प्रत्यक्षात पाऊस काही पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. काहींनी पेरण्या केल्या परंतु बियाणं वाया गेलं.

आजपासून मान्सूनचं पुनरागमन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. मुंबईत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. इतर राज्यातमध्ये नागपूर, नांदेड आणि काही ठिकाणी पाऊस सुरु झालेला आहे. तर अनेक ठिकाणी वातावरणात बदल झालेला असून ढग दाटून आलेले आहेत.

८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र ११ जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली. मात्र पुन्हा पाऊस गायब झाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून गेल्याचं सांगण्यात येत आहे. नंतर हवामान विभागाने २३ जून रोजी मान्सून परतणार असल्याचं सांगितलं होतं.

आज सबंध महाराष्ट्राला मान्सूनची प्रतीक्षा आहे. सकाळी मुंबईमध्ये हलक्या सरी बरसल्या. तसेच नागपूरमध्ये पावसाला कालपासूनच सुरुवात झालेली आहे. नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये पाऊस सुरु झालाय. तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली.आज सबंध महाराष्ट्राला मान्सूनची प्रतीक्षा आहे. सकाळी मुंबईमध्ये हलक्या सरी बरसल्या. तसेच नागपूरमध्ये पावसाला कालपासूनच सुरुवात झालेली आहे. नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये पाऊस सुरु झालाय. तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली.

उशिरा का होईना पण मान्सून दाखल झालेला आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार पावसाची अपेक्षा आहे. बळीराजा पेरणीसाठी अडकून पडला आहे. सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्याने त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आजपासून तरी वरुणराजा बरसावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button