महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! अजित पवारांनी व्यक्त केलेली भीती ठरणार खरी

यावरूच विरोधक देखील बीआरएसबाबत सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. प्रचाराला सुरुवात के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आगामी निवडणुका डोळ्यासमोर जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा देखील झाल्या आहेत.
इतर पक्षातील अनेक नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये देखील धडक मारली आहे. काही दिवसांपूर्वीच के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते नागपुरात बीआरएसच्या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
यावेळी त्यांनी कार्यकर्ता मेळावा देखील घेतला आहे.विठ्ठलाचं दर्शन घेणार त्यानंतर आता के. चंद्रशेखर राव हे आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन पंढरपुरात येणार आहेत. ते २७ जून रोजी पंढरपुरात येऊन आपल्या मंत्र्यांसह विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. तसेच ते विठ्ठलाच्या दर्शनानंतर तुळजाभवानीचं देखील दर्शन घेणार आहेत. त्यामुळे आता के. चद्रशेखर राव यांना महाराष्ट्र स्विकारणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


