मनोरंजन 

अभिनेता अविनाश नारकर यांच्यावर पार पडली शस्त्रक्रिया

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अविनाश नारकर हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. सध्या ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात.

त्यांचे अनेक डान्सचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता त्यांच्याबाबत एक वेगळी बातमी समोर आली आहे. नुकतेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

अविनाश नारकर यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. काल शुक्रवारी त्यांनी इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, “जय हरी विठ्ठल || आज आषाढी एकादशीच्या दिवशी या पांडुरंगाच्या हस्तस्पर्षाने माझ्या दृष्टीची स्पष्टता वाढली.!! विठ्ठल विठ्ठल || जय हरी विठ्ठल.” यासोबत त्यांनी हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला. यात त्यांच्या पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि डॉक्टर तात्याराव लहाने दिसत आहेत. तर त्यांच्या मागे भिंतीवर विठ्ठलाचा फोटो दिसत आहे.

अविनाश नारकर यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया तात्याराव लहाने यांनी केली आहे. अविनाश यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ते ‘कन्यादान’ मालिकेत काम करत असून यात ते चार मुलींच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button