उपमुख्याध्यापिकेचा भाजप आमदाराला दम; तुमच्यात एकट्याने बोलण्याची हिंमत नाही का?

ठाणे : उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने यावर्षी ३ पट फी वाढ केल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. त्यांनी याप्रकरणाची भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर आमदार गायकवाड यांनी या शाळेच्या प्रशासनाची भेट घेत त्यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेत गेलेल्या आमदारांना उपमुख्याध्यापिकांनी तुमच्यात हिंमत नाही का एकट्याने बोलण्याची असा दम दिला.
आमदार आणि उपमुख्याध्यापिकांमध्ये झालेल्या वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या वेळेत आमदार गायकवाड यांच्यासोबत काही पालक उपस्थित होते. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका यांनी तुमच्यासोबत आलेल्यांना बाहेर पाठवा. तुमच्या एकट्यामध्ये बोलण्याची हिंमत नाही, का असा दम चक्क भाजप आमदारांनाच दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या उपमुख्याध्यापिकेला चांगलेच धारेवर धरत खडसावलं आहे.


