महाराष्ट्रराजकारण

शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य; राष्ट्रवादीच्या बंडानंतर राज्यात आणखी भूकंप होणार

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना आपल्याबरोबर घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इतर नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

या राजकीय नाट्यानंतर आता राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयीचे सूचक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आहे.

महाराष्ट्रातील सत्तेत आणखी एक गट लवकरच सामील होईल असे वक्त्यव्य शिरसाट काँग्रेसचे १६ ते १७ आमदार संपर्कात आहेत, असं विधान शिरसाट यांनी केलं आहे. ते .एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. आणखी एक सत्तेत येईल. काँग्रेसचे १६-१७ आमदार संपर्कात आहेत, असं बोललं जातंय, यामध्ये किती तथ्य आहे? असं विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “काँग्रेस पक्ष फुटणार आहे, हे नक्की आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकर होणार आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदं दिली जातील, हेही तेवढंच सत्य आहे.”

“काँग्रेस कधी फुटतेय आणि ते कधी सत्तेत येतात? यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण काँग्रेस फुटणार आहे, हे नक्की आहे. काही काळानंतर काँग्रेसही आमच्याबरोबर दिसेल,” असंही शिरसाट म्हणाले. शिरसाट यांच्या विधानामुळे पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार का? आणि काँग्रेसमधील कोणता गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button