महाराष्ट्रराजकारण

१६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई लवकरच; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची माहिती

मुंबई : विधिमंडळ सचिवालयाकडे शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भातील कारवाईसाठी आवश्यक शिवसेनेच्या घटनेची प्रत गेल्या आठवडय़ात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधिमंडळाला प्राप्त झाली आहे . त्यामुळे सर्वेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार अपात्रेसंदर्भातील कारवाईला लवकरच सुरुवात होईल , असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले .

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात सर्वेच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यासाठी शिवसेनेच्या घटनेची प्रत महाराष्ट्र विधिमंडळाला उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी विधिमंडळ सचिवालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button