पनवेल इर्शाळवाडी संपर्कासाठी रेडीओ आणि सेलेलाईटची मदत
रायगड : पनवेल इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर येथील वाडी वर पडलेला दगडमातीचा ढिगारा उपसा करण्याचे काम दूस-या दिवशी शुक्रवारी जोरदार सूरु होते मात्र सततच्या पावसामुळे एनडीआरएफच्या जवानांसमोर मदतकार्य करण्यासाठी मोठे आव्हान उभे आहे. वाडी ते पायथ्यावरील बेस कॅम्पपर्यंतचा सहा किलोमीटरचे खडतर अंतर पायी चालण्यासाठी साडेतीन तास लागत असल्याने वीज नसलेल्या या परिसरात संपर्क साधण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने हॅम रेडीओ आणि एनडीआरएफने सेटेलाईटची मदत घेतली जात आहे.
हॅम रेडीओ पाच व्हॅटचे असल्याने हा व्हीएचएफ सेट आहे. यातून एकाच वेळे १० किलोमीटर अंतरापर्यंत संपर्क साधता येतो अशी माहिती येथील अधिका-यांनी दिली. तसेच यात संपर्क यंत्रणा एंटीना टू एंटीना असल्याने कोणत्याही इंटरनेट विना हा संपर्क व्यवस्था सूरु होता. एनडीआरएफच्या बचाव दलाची चार पथके शुक्रवारी सकाळपासून कार्यरत होती. मदतकार्यासाठी पायी वाडीपर्यंत जाणे, तेथील वाट निसरडी असल्याने जेसीबी व इतर साहीत्याची मदत न मिळणे, या दरम्यान पावसाने उघडीप न घेतल्याने साडेतीन किलोमीटरचा पायी प्रवास करुन बचाव दलाच्या जवानांना घटनास्थळापर्यंत पोहचणे हेच मुख्य आव्हान आहे. त्यानंतर पावसात मदतकार्याचे काम करणे हे दूसरे आव्हान आहे. जवानांनी माती व दगडाचा उपसा करण्यासाठी हातात जमेल तेवढेच साहित्य वर घटना स्थळी घेऊन जाता आहेत त्यामुळे माती व दगड काढल्यानंतर तेथे पाणी साचत असल्याचा मोठा फटका मदतकार्याला बसला. त्यामुळेच मदतकार्य पुर्ण होण्यासाठी निश्चित वेळ किती लागेल याचा अंदाजही एनडीआरएफ जवानांना बांधता येत नव्हता.



