जीवनशैली

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती चालणे आवश्यक ?

आरोग्य : वजन कमी करणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. कितीही उपाय करून अनेकांचं वजन कमी होत नाही. तसं तर वजन कमी करण्याचा कोणताही परफेक्ट फॉर्म्युला नाही. मात्र १ महिन्यात १० किलो वजन घटविण्यासाठी किती चालू शकता याचं गणित तज्ज्ञांनी मांडलं आहे. अनेकांच्या मनात नेहमी हा प्रश्न असतो की, वजन कमी करण्यासाठी चालणं हा उत्तम व्यायाम सांगितला जातो. मात्र नक्की किती किलोमीटर चालावे?

वजन कमी करण्यासाठी किती चालावे याचा अंदाज आल्यास वजन कमी करणे सोपे होईल. एखाद्या व्यक्तीचे वजन १० किलो कमी करायचे असेल तर किती चालावे लागेल याची उत्तरं तुम्हाला या लेखातून मिळतील. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासानुसार याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे

वास्तविक वजन कमी करण्यासाठी रोज किती किलोमीटर चालावे यासाठी काही फुलप्रूफ पद्धत नाही. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा अनुभव येतो. मात्र त्यासाठी अनेक गोष्टीही जबाबदार ठरतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, १ मैल अर्थात १.६ किलोमीटर चालण्यामुळे ५५ ते १४० कॅलरी शरीरातून कमी होते. मात्र हे तुमच्या चालण्याच्या वेगावर अवलंबून आहे. तर ब्रिटीश नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार रोज कमीत कमी १५० मिनिट्सचे मॉडरेट वॉकिंग करणे आवश्यक आहे. तुम्ही वेगाने चालत असाल तर ७५ मिनिट्स चालायला हवे.

आजकाल रोज १० हजार पावलं चालण्याचा सल्ला अनेक ट्रेनर्सकडूनही देण्यात येतो. मात्र प्रश्न उपस्थित होतो की, किती चालल्यामुळे वजन कमी होते? याचं उत्तर आहे की, प्रत्येक व्यक्तीनुसार हे प्रमाण वेगवेगळे असू शकते. काही जण १ महिन्यात १० किलो वजन कमी करतात तर काही जणांना २ महिनेही लागू शकतात. किती वजन कमी होणार हे आपल्या चालण्यावर अवलंबून असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button