क्रिडाविश्व

भारताचा वेस्ट इंडिजवर ९ विकेट्सने दणक्यात विजय!शुभमन गिलची ‘यशस्वी’ खेळी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा ९  गडी राखून पराभव केला.

त्यामुळे आता भारताने मालिकेत २ -२ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात कुलदीप आणि अर्शदीपच्या धारदार गोलंदाजीसह शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालची दमदार फलंदाजी पहायला मिळाली. चौथा सामना जिंकल्याने आता टीम इंडियाने मालिकेत लाज राखली आहे. त्यामुळे आता आगामी सामना दोन्ही संघासाठी अतितटीचा असेल.

सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना १७९  धावांचे लक्ष्य दिलं होतं, जे भारताने तीन ओव्हर शिल्लक असताना पूर्ण केले. भारताकडून यशस्वी जयस्वालने ५१  चेंडूत ८४  धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत त्याने ११  चौकार आणि ३ शानदार षटकारही मारले. तर सलामीवीर शुभमन गिलने देखील त्याला मोलाची साथ दिली. शुभमनने ४७  बॉलमध्ये ७७  धावांची वादळी खेळी केली. तर शुभमन आऊट झाल्यावर तिलक वर्माने जलवा दाखवत ७  धावा केल्या आणि भारताला विजय पक्का केला.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली. मात्र, अर्शदीपने दांड्या उडवण्यास सुरूवात केली. अर्शदीपने दोन्ही सलामीवीरांना तंबुत पाठवलं. त्यानंतर सुरू झाला कुलदीपचा जलवा, कुलदीपने दोन दणक्यात विकेट काढले अन् टीम इंडियाला सामन्यात खेचून आणलं. त्यानंतर हेटमायरने तुफानी खेळी करत ३९  बॉलमध्ये ६१  धावा खेचल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजला १७८  धावा उभारता आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button