जीवनशैली

सलग आठवडाभर दारू प्यायल्याने व्यसन लागते का? घ्या जाणून

आरोग्य : दारूची नशा घरा-दाराला जाळी… असे म्हटले जाते. दारूच्या व्यसनाने घराकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून फक्त मद्य धूंद राहणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहत असतो. मद्याच्या व्यसनाने कुंटुंब आणि आयुष्य उद्ध्वस्त होताना आपण पाहिले आहेत.

पण हल्ली ऑकेजनली ड्रिंकींग ही संकल्पना मोठ्याप्रमाणात सर्वत्र बघायला मिळते. कामाच्या ठिकाणच्या लोकांसोबत, सहकाऱ्यांसोबत, मित्रमंडळींसोबत पार्टी करायची म्हणजे हार्ड ड्रिंक्स हवेत आणि हा प्रतिष्ठेचा विषय असल्याचे म्हटले जाते.

मग दारूचे व्यसन म्हणजे काय? ते कसे लागते? हा प्रश्न असतोच. सलग आठवडाभर मद्यपान केलं तर व्यसन लागतं का? जाणून घेऊया.

दारूचं व्यसन कसं लागतं?
मद्यपान फार पूर्वीपासून चालत आले आहे. याचे दाखले आपल्याला पुराणातल्या कथांमध्येसुद्धा मिळतात. तज्ज्ञ सांगतात, दारूचे व्यसन हे तीन टप्प्यांमध्ये होते.
पहिल्या टप्प्यात तुम्ही दारू पित असतात, पण तुम्हाला त्याचे व्यसन लागले आहे हे लक्षात येत नाही. ही व्यक्ती भरपूर दारू पिते पण स्वतःवरील नियंत्रण गमवत नाही.
अशात त्या व्यक्तीला आपण दारू पिण्यात प्रो बनला असल्याचं वाटतं, पण तो तिथेच सर्वात मोठी चुक करत असतो.

व्यसनाचा मधला आणि शेवटचा टप्पा :
मधल्या टप्प्यात तुम्हाला तुमच्या शरीरांतर्गत होणारे बदल जाणवतात. समाजातील तुमचं वागणं, लोकांसोबतची वागणूक बदलल्याचे जाणवेल.
व्यसनाच्या शेवटच्या टप्प्यात लोक दारू पिऊन संपूर्ण नियंत्रण गमवतात. या टप्प्यात तुम्ही दारूशिवाय जगूच शकत नाही. या अंतिम टप्प्यात विविध आजारांनी तुम्हाला घेरलेलं असतं. या स्थितीत तुमच्या जीवनाची दुर्गती होते. यात आर्थिक, शारीरिक नुकसानही होते.

सलग आठवडाभर दारू प्यायल्याने व्यसन लागतं का?
या बाबत तसे तर ठोस पुरावे सापडत नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे की, जर रोज तुम्ही जास्त प्रमाणात मद्यपान केले तर त्यामुळे शरीराचे मोठे नुकसान नक्कीच होऊ शकते. दारू तुमच्या फक्त शारीरिक आरोग्यावर नाही तर मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम करते. त्यामुळे या व्यसनाचे तोटे, दुष्परिणाम जाणून घेणं आवश्यक असते.
जर मद्याचे व्यसन सोडले तर तुमच्या मानसिक आरोग्यातही सुधार होऊ शकतो. यामुळे वैयक्तीक, कौटुंबिक ताण तणाव कमी होतो.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button