मनोरंजन 

‘सुभेदार’च्या शिरपेचात मानाचा तुरा! प्रदर्शनाआधीच नोंदवला ‘हा’ विक्रम

गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठा पडदावर पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच नवीन विक्रम नोंदवला आहे.

या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. सोशल मीडियावरून ते त्यांची उत्सुकता व्यक्तही करताना दिसत आहेत. या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. तर आता अशातच या चित्रपटाने नवीन रेकॉर्ड केला आहे. प्रदर्शनाच्या आधीच बुक माय शोवर ४० हजाराहून अधिक इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला सुभेदार हा पहिला वहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटाने केलेल्या या कामगिरीबद्दल संपूर्ण टीम सोशल मीडियावरून आनंद व्यक्त करत आहे. तर त्यांच्या या पोस्टला कमेंट करत नेटकरी देखील त्यांना या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, स्मिता शेवाळे, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे, असतात काळे असे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button