मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते, हे मी अभिमानाने म्हणू शकते – अभिनेत्री मिताली मयेकर

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. या लग्नाचे काही फोटो अभिनेत्री मिताली मयेकरने शेअर केले सून सासूने न डगमगता घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हॅप्पी मॅरीड लाइफ सासुबाई असे म्हटले आहे. माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते असा सवाल करत ती म्हणते, की मी हे अभिमानाने म्हणू शकते.
मिताली मयेकरने आपल्या सासूबद्दल केलेल्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती आपल्या पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते, खरंच मला अभिमान वाटतो तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहीला आणि मला अभिमान वाटतो, या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा अशा शब्दात मितालीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं काही अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम असे मितालीने म्हटले आहे. सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यात आईच्या सुखी संसारासाठी त्याने प्रार्थना केली आहे. त्यानतंर मिताली मयेकरनेसुद्धा सोशल मीडियावर फोटो शेअर करत हॅप्पी मॅरीड लाइफ सासुबाई असे म्हटले आहे. माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते असा सवाल करत ती म्हणते, की मी हे अभिमानाने म्हणू शकते.



