सुनील गावसकरांची बीसीसीआयकडे अनोखी मागणी; म्हणाले, ‘सचिन आणि अमिताभप्रमाणे…’

क्रिकेट : ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. त्याचवेळी, या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र, आता सुनील गावसकर यांनी बीसीसीआयकडे एक मागणी केली आहे. सुनील गावसकर म्हणाले की, महेंद्रसिंग धोनी आणि इस्रो प्रमुख यांनाही गोल्डन तिकिटे मिळावीत अशी माझी इच्छा आहे.
बीसीसीआयने यापूर्वी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकीट देण्यात आले होते. विश्वचषकाचे गोल्डन तिकीट मिळवणारे अमिताभ बच्चन हे पहिले व्यक्ती होते. यानंतर बीसीसीआयने सचिन तेंडुलकरला गोल्डन तिकीट दिले. १९८३ मध्ये भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणारे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयच्या या उपक्रमाचे कौतुक केले. आपापल्या क्षेत्रातील अग्रगण्यांचा सन्मान करण्याचा हा एक स्तुत्य मार्ग आहे, यावर त्यांनी भर दिला.
मात्र, ‘गोल्डन तिकीट’ मिळवणाऱ्यांसाठी गावसकर यांच्या मनात काही नावे होती. त्यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चंद्रावर ऐतिहासिक लँडींग केले. त्यांच्या नावाची शिफारस केली. याव्यतिरिक्त, गावस्कर यांनी बीसीसीआयने दोन प्रतिष्ठित विश्वचषक विजेते कर्णधार, कपिल देव आणि एमएस धोनी यांना गोल्डन तिकिटे देऊन सन्मानित करण्याची इच्छा व्यक्त केली. अलीकडच्या काळात देशाला गौरव मिळवून देणाऱ्या इतर नामवंत खेळाडूंचाही उल्लेख केला.
स्पोर्टस्टारसाठीच्या त्यांच्या स्तंभात, गावसकर यांनी त्यांचे विचार व्यक्त करताना लिहले, “बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे हा एक चांगला निर्णय आहे. आतापर्यंत अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी गोल्डन तिकिटे मिळाली आहेत.”
सुनील गावसकर म्हणाले, “यादीतील अतिरिक्त लोकांची संख्या अज्ञात आहे. तथापि, यामध्ये इस्रोच्या संचालकांचा समावेश अपेक्षित आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चंद्रावर उतरण्याची कामगिरी केली. त्या शहरांमध्ये होणार्या सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी संघटनांना त्यांच्या संबंधित शहरांतील भारतीय खेळाडूंना आमंत्रित करण्याचे निर्देश दिले तर एक उल्लेखनीय उपक्रम ठरेल. अर्थात, दोन विश्वचषक चॅम्पियन कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव हे आणखी दोन खेळाडू गोल्डन तिकिटांसाठी पात्र आहेत.”



