महाराष्ट्र

वसई विरार वाहतूक विभागाने नोटीस बाजावताच वाहन चालकांनी भरला ३८ लाखांचा दंड

वसई : ई चलन कारवाईचा दंड भरण्याकडे वाहनचालकांनी पाठ फिरवली होती.त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा दंड थकीत होता. परंतु वाहतूक पोलिसांनी लोकन्यायालयात  धाव घेत नोटीस बजावताच वसई विरार मधील ७ हजार ४२३ वाहनचालकांनी सुमारे ३८ लाख ४६ हजारांचा दंड भरला आहे. वसई विरार वाहतूक विभाग परिमंडळ २ व ३ यांच्या मार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाते. सुरवातीला वाहतूक पोलीस व नागरिक यांच्यात अनेकदा दंडात्मक कारवाईमुळे खटके उडत होते. असे प्रकार रोखण्यासाठी ई चलन प्रणाली कार्यान्वित करून

 इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कारवाई केली आहे. या ई चलन यंत्राद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात अशा वाहन चालकांवर कारवाई होते. मात्र आता ऑनलाइन स्वरूपात होत असलेल्या कारवाईमुळे अनेक वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याचा फटका वाहतूक विभागाला बसत असतो. त्यामुळे वाहतूक विभागाचा कोट्यावधी रुपयांचा दंड हा थकीत राहिला आहे. हा दंड भरावा अशी वाहतूक पोलीस वारंवार सूचना करतात. मात्र तरीही त्याला कोणताही प्रतिसाद देत नाहीत. वाहनचालक दंड भरण्यासाठी पुढे येत नसल्याने वाहतूक पोलिसांमार्फत ही प्रकरणे लोकन्यायालयात ठेवली जात आहेत.

नुकताच ९ सप्टेंबर रोजी वसईत राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने आकारलेल्या  ई-चलनाचे दावे आता निकाली निकाली काढण्यासाठी वाहतुक पोलीसांनी वाहन चालकांना न्यायालयाची नोटीस एसएमएस द्वारे पाठविली होती. मात्र नोटीस हाती पडताच अनेक वाहन धारकांनी लोकन्यायालयात जाण्यापूर्वीच दंडाचा भरणाकडे धाव घेतली होती. १ ते ९ सप्टेंबर या कालावधीत  वसईतून ५ हजार ६४६ वाहनधारकांच्या प्रकरणात २७ लाख ४९ हजार २०० तर विरार वाहतूक विभागात १ हजार ७७७ प्रकरणात १० लाख ९६ हजार ८०० असा एकूण ३८ लाख ४६ हजारांचा दंड भरला असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

यंदाच्या चालू वर्षात वसई विरार मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान ई चलनाची सुमारे १९ हजाराहून अधिक प्रकरणात दीड कोटींचा दंड थकीत होता. लोकन्यायालयामुळे जवळपास ३८ लाखांचा दंड वसूल झाला आहे. असे जरी असले तरीही एक कोटी रुपयांचा दंड अजूनही थकीत राहिला आहे.

ई चलन कारवाया करूनही जे दंड भरत नाहीत अशी प्रकरणे आता आम्ही लोकन्यायालयात दाखल करतो. त्यामुळे अशा प्रकरणांची निर्गती होण्यास मोठी मदत होऊ लागली आहे. – सागर इंगोले, वाहतूक पोलीस निरीक्षक परिमंडळ २

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button