मनोरंजन 

अथिया शेट्टीकडून पती के एल राहुलचं कोतुक, म्हणते – ‘बेस्ट गाय एव्हर…’

वृत्तसंस्था : विवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईच्या मैदानावर महामुकाबला झाला. भारताने ऑस्ट्रेलियाचा २०१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच भारताच्या तीन विकेट घेतल्या. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल मैदानात उतरले आणि बाजी पलटवली. केएल राहुलने षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. दमदार खेळीनंतर देशभरातील क्रिकेटप्रेमींनी राहुलचं कौतुक केलं. राहुलची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीनेही खास पोस्ट केली.

अथिया शेट्टीने पती राहुलचं कौतुक केलं. राहुलचा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “सर्वोत्तम व्यक्ती”. तसेच तिने राहुल आणि विराटची आणखी एक पोस्ट शेअर करून क्रिकेट सामन्यातील विजयाबद्दल आनंद व्यक्त केला

अथियासोबतच बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानानेही चेन्नईतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल केएल राहुलचे कौतुक केलं. या विजयामुळे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला सकारात्मक सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघानं शेवटचा विश्वचषक २०११ मध्ये जिंकला होता. त्यानंतर दोन विश्वचषक होऊन गेले, पण टीम इंडियाचे हात रिकामेच राहिले. मात्र, यावेळी विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. अशातच मायभूमीवर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत १२ वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदाकडे लक्ष लागलं आहे.

अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर तिने २०१५ मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती २०१७ मध्ये ‘मुबारकां’ चित्रपटात दिसली. अथिया शेवटची २०१९ मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’मध्ये दिसली होती. राहुल आणि अथिया शेट्टी २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नापूर्वी अथिया-राहुल तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button