मनोरंजन 

रजनीकांत– अमिताभ बच्चन ३३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र; अभिनेत्याने केली नव्या चित्रपटाची घोषणा

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचे करोडो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा जेलर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. आता रजनीकांत यांचा नवीन चित्रपट ‘थलाइवर १७०’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन झळकणार आहेत.

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन तब्बल ३३ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. रजनीकांत यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करीत याबाबत माहिती दिली आहे. रजनीकांत यांनी ट्विटरवर अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करीत त्यांनी लिहिले. “३३ वर्षांनंतर मी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘थलाइवर १७०’मध्ये काम करणार आहे. लायका प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल करणार आहेत. माझं हृदय आनंदानं उड्या मारत आहे.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘थलाइवर १७०’ वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित आहे. त्यामध्ये रजनीकांत एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी ‘हम’, ‘अंधा कानून’ व ‘अटक’ या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. रजनीकांत आणि अमिताभ यांच्याशिवाय या चित्रपटात राणा दग्गुबती, फहद फसिल, रितिका सिंग, मंजू वॉरियर व दसरा विजयन मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अरिरुद्ध रविचंद्र आहेत. शाहरुखच्या सुपरहिट जवान या चित्रपसाठीही अरिरुद्ध यांनीच संगीत दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button