महाराष्ट्र

मुंबई परिसरातील २७ उड्डाणपुलांचं होणार स्ट्रक्चरल ऑडिट; MSRDC चा निर्णय

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील २७ उड्डाणुलांचं स्ट्रक्टरल ऑडिट करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विकार महामंडळाने (MSRDC) घेतला आहे. यात मुंबईतील महत्त्वाच्या पुलांचा समावेश आहे. आधी ही तपासणी IIT मार्फत केली जाणार होती. मात्र, आता हीच तपासणी VJTI मार्फत करण्याचा निर्णय MSRDC ने घेतला आहे. MSRDC ने मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १९९६ मध्ये ५५ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, २७ उड्डाणपूल, ४ भुयारी मार्ग, एक रेल्वे ओव्हर ब्रीज, एक खाडीपूल, चार जंक्शन असे एकूण ३७ पूल बांधण्यात आले. दरम्यान, २७ उड्डाणपुलावरील पथकर वसुलीचे अधिकार संपुष्टात येणार असून त्यानंतर हे उड्डाणपूल पालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून या कामाला सुरूवात होणार आहे आणि एका महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश MSRDC ने दिले आहेत.

सीएसटी उड्डाणपूल- चेंबूर, अंधेरी घाटकोपर लिकं रो़ड पूल-चेंबूर, विक्रोळी पूल- विक्रोळी, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड पूल- कांजुरमार्ग, गोरेगाव झ्र मुलुंड लिंक रोड पूल-मुलुंड, नितीन कास्टिंग पूल- ठाणे, गोल्डन डाईज पूल- ठाणे, कलिना वाकोला पूल- सांताक्रुझ, आरे कॉलनी पूल- गोरेगाव, फिल्मसिटी पूल- गोरेगाव, नॅशनल पार्क पूल- बोरिवली, सायन उड्डाणपूल-शीव, बीएआरसी जंक्शन पूल-अनुशक्ती नगर, वाशी पूल- वाशी आदी पुलांची तपासणी करण्यात येणार आहे.

हे उड्डाणपूल हस्तांतरित करताना ते मजबूत अवस्थेत असावेत असं म्हणत एमएसआरडीसी ने २७ उड्डाणपुलांची संचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयआयटीमार्फत ही तपासणी करण्याचा निर्णय घेत हे कामही आयआयटीला देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. मात्र, आता यात बदलत करत आयआयटीकडून सखोल तपासणी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पुलांची भार क्षमता, बेअरिंगची स्थिती, पुलाची मजबुती तपासण्यासह पुलाची दुरुस्ती करणं आवश्यक आहे का हे निश्चित करण्याच्या उद्देशाने ही संरचनात्मक तपासणी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button