महाराष्ट्र

पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा

पुणे : वाहनाला आकर्षक नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) या क्रमाकांचा काळाबाजार सुरू झाला आहे. यासाठी आरटीओतील दलालांनी पर्यायी यंत्रणा उभारली असून, प्रसंगी कर्मचाऱ्यांनाही धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. महागडी मोटार खरेदी केल्यानंतर तिला क्रमांकही आवडीचा हवा, अशी अनेकांची हौस असते. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याची त्यांची तयारी असते. यामुळे आरटीओकडून आर्थिक वर्ष २००४-०५ पासून आकर्षक क्रमांकांचा लिलाव करण्यास सुरुवात झाली. त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळणारा महसूल वर्षानुवर्षे वाढत आहे. आरटीओला आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांतून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आकर्षक वाहन क्रमांकाच्या लिलाव प्रक्रियेत आता दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यांच्याकडून या क्रमांकाचा काळाबाजार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button