महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, UTS APP मध्ये मोठा बदल, मुंबईकरांनाही होणार फायदा

मुंबई : तिकिटासाठी रांगेत ताटकळत उभं राहण्याची आता गरज नाहीय. रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. रेल्वेने युटीएस ॲपमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं आता प्रवाशांना रांगेत उभं न राहताही प्लॅटफॉर्मवरच लोकलचे तिकिट काढता येणार आहे. रेल्वेने केलेल्या या बदलामुळं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रेल्वेने हा बदल केला आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरांतील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

भारतीय रेल्वे ही देशाची लाइफलाइन आहे. रेल्वेतून प्रवास करायचा म्हणजे कन्फर्म तिकिट असायलाच हवे. साधारणतः मोठ्या स्थानकांत तिकिटघरांत तिकिटांसाठी मोठी रांग लागलेली असते. प्रवाशांना तिकिट काढणे सोप्प व्हावे, यासाठी रेल्वेने युटीएस ॲपमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं लोक आरामात तिकिट काढू शकणार आहेत. रेल्वेने अनारक्षित तिकिट काढण्यासाठी युटीएस ॲप डेव्हलप केले आहे. जेणेकरुन रांगेत उभं न राहताना जनरल तिकिट आणि प्लॅटफॉर्म तिकिट काढता येऊ शकणार आहेत. प्रवासी महिन्याचा पासदेखील काढू शकतात. मात्र, सुरुवातीला तिकिट काढण्यासाठी काही मर्यादा होत्या. रेल्वे रूळांपासून २० मीटर दूर असतानाच तिकिट काढू शकता यायचे. मात्र, आता रेल्वेने ही मर्यादा शून्य केली आहे.

रेल्वेने युटीएस ॲपवर तिकिट काढण्यासाठी संपूर्ण देशातील रेल्वे रूळांसाठी जिओ फेसिंग केली आहे. कारण लोक ट्रेनमध्ये चढल्यानंतर टीटीला बघून तिकिट काढू शकतात. त्यामुळं रेल्वे रूळांपासून २० किमी अंतरावर असताना ॲपमधून तिकिट काढण्याची मर्यादा होती. मात्र आता त्यात बदल करुन ही मर्यादा शून्य केली आहे. म्हणजेच प्लॅटफॉर्म उभं राहूनही तुम्ही तिकिट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला स्थानकाच्या बाहेर जावं लागणार नाही.

अनारक्षित तिकिट काढण्यासाठी युटिएस ॲपमधून तिकिट काढण्यासाठी तुम्हाला युटीएस ॲप डाउनलोड करावं लागेल. हे ॲप अँड्रोइड आणि IOS प्लॅटफॉर्मवरुन डाइनलोड करु शकतात. जर तुमच्याकडे अँड्रोइड फोन आहे तर प्ले स्टोअर मधून हे ॲप डाउनलोड करु शकता. युटीएस ॲपमधून तिकिट काढताना दोन पर्याय आहेत. पहिला पेपरलेस म्हणजेच ॲपमधूनच तुम्ही टीटीला तिकिट दाखवू शकता. तर, दुसरा पर्याय प्रिंटेड तिकिट त्यासाठी तुम्हाला ॲपमधून रेल्वे स्थानकात लावलेल्या ऑटोमॅटिक वेंडिग तिकिटमधून पेपर तिकिट प्रिंट करु शकतात.

मुंबईसारख्या शहरांसाठी युटिएसमधील हा बदल मोठा दिलासादायक ठरणार आहे. हजारो लोक या ॲपवर अवलंबून आहेत. सध्या २५  टक्के लोक युटिस ॲपवरुन तिकिट घेतात. आता या बदलामुळं युटिएस ॲपचा वापर आणखी वाढणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button