मनोरंजन 

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं तब्बल ६१ किलो वजन

सेलिब्रिटी त्यांच्या लाइफस्टाइलमुळे कायमच चर्चेत असतात. कलाकारांना फिट राहणं गरजेचं असतं. वजन वाढल्यामुळे अनेकदा कलाकारांच्या हातातून भूमिका निसटताना दिसतात. त्यामुळे कलाकार त्यांच्या शरीराची काळजी घेताना दिसतात. अनेकदा सेलिब्रिटींचे ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो व्हायरल होतात. कधी भूमिकेसाठी तर कधी बारीक होण्यासाठी कलाकार वजन घटवतात. अशाच एका मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आरती सोळंकी आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि प्रसिद्ध अभिनेत्री आरती सोळंकी चर्चेत आली आहे. आरतीने तब्बल ६१ किलो वजन घटवलं आहे. तिचं हे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. आरतीने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने ६१ किलो वजन कमी केल्याचं म्हटलं आहे. आधी आरतीचं वजन १३२ किलो होतं. आता तिचं वजन ७१ किलो आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आरतीने नियमित व्यायाम, डाएट करून वजन घटवलं आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. ‘वृंदावन’ या सिनेमातही ती झळकली होती. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतही ती दिसली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button