महाराष्ट्र

मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण, २७ तारखेला निघणार जीआर; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई : राज्यातील विद्यार्थिनींना आता मोफत उच्च शिक्षण मिळणार असून त्याचा जीआर २७ तारखेपासून काढला जाणार आहे. याबाबत माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे ही एक विद्यार्थिनींसाठी आंदाची बातमी आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाईल, असे आश्वासन उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. असे असताना मात्र शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरीदेखील मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याचा जीआर निघाला नव्हता मात्र आता हा जीआर २७ तारखेपासून काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपासून या वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण दिले जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. महाराष्ट्र राज्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मुलींना बारावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेब्रुवारी रोजी ही घोषणा केली होती. जून महिन्याच्या ८ तारखेपासून मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. यामुळे आता याचा याचा अनेकांना फायदा होणार असून याबाबत अनेकदा मागणी केली जात होती.

दरम्यान, राज्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मुलींना बारावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. यासाठी काही अटी देखील आहेत. मोफत शिक्षणासाठी पालकांचे आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असावं. तसेच कला- विज्ञान- वाणिज्यबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या १०० टक्के शुल्काचा परतावा राज्य सरकार करेल. राज्यातील २० लाखांहून अधिक विद्यार्थिनींना याचा फायदा होणार. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button