महाराष्ट्र

शहरातील ‘हा’ महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग गणेश चतुर्थीला होणार सुरू

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुणे, नागपूर, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे या संबंधित शहरांमधील नागरिक मोठे त्रस्त आहेत. हेच कारण आहे की ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.

पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यातही मेट्रोचे जाळे विणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्यातनाम असणाऱ्या या शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट यादरम्यान मेट्रो सुरू आहे.

दरम्यान सिविल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गासंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर सिविल कोर्ट ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रो मार्ग तयार होत आहे. याचे काम गेल्या काही वर्षांपासून युद्ध पातळीवर सुरू असून आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुणेकरांना भुयारी मेट्रो ने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या मार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा देशातील दुसराच असा मार्ग आहे जो की नदी खालून जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या गणेश चतुर्थीला हा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.

यावर्षी गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर २०२४ ला असून या दिवशी सिविल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानचा भूमिगत मेट्रो मार्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे. जमिनीपासूनच १०० फूट खालून हा मेट्रो मार्ग तयार करण्यात आला आहे. म्हणजेच हा मार्ग भूमिगत आहे. पुण्यातील हा पहिलाच मेट्रो मार्ग आहे जो की भूमिगत आहे. यामुळे या मार्गाबाबत पुणेकरांमध्ये मोठी उत्सुकता असून हा मार्ग कधी सुरू होणार असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात होता.

अखेर कार हा मार्ग सात सप्टेंबरला सुरू होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील जनतेचा प्रवास आणखी सोयीचा होणार आहे. सदर मेट्रो मार्गामुळे शिवाजीनगर अर्थातच सिविल कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास मेट्रो ने करता येणे शक्य होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button