महाराष्ट्र

झोपु प्राधिकरणाची ‘धारावी’ साठी विविध प्राधिकरणांच्या २० जमिनींची मागणी

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पात अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबईभरातील जमिनी संपादित करण्याचा सपाटा लावला आहे. विविध प्राधिकरणांच्या ताब्यातील २० जमिनींची मागणी केली असून त्यात जकातनाक्यांच्या जमिनींसह मिठागरे आणि कर्मचारी वसाहतींच्या जागांचा समावेश आहे. प्रकल्पाचा आराखडाही तयार नसताना जमिनींचे भूसंपादन करण्याच्या प्राधिकरणाच्या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा खासगी कंपनीमार्फत पुनर्विकास करण्यात येत असून त्यावर आधीपासूनच वेगवेगळ्या कारणांनी टीका होत आहे. पुनर्विकासादरम्यान धारावीतील रहिवाशांचे अन्यत्र स्थलांतर करण्याचा मुद्दा तापला असतानाच प्रकल्पात अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन हाही मोठा पेच ठरत आहे. पुनर्वसनासाठी झोपु प्राधिकरणाने मुंबईतील विविध जमिनींचा शोध सुरू केला आहे. मुलुंडमधील माहिती अधिकार कार्यकर्ते सागर देवरे यांना माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, प्राधिकरणाने एकूण २० जमिनी निश्चित केल्या आहेत. या जमिनी मुंबई महापालिका, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात असून या प्राधिकरणांनीही मागणी केल्या जमिनी धारावी प्रकल्पासाठी देण्याची तयारी दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button