महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी ११११ फुट तिरंगा पदयात्रेचं आयोजन

नवीमुंबई : भारत उद्या ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. घरोघरी या स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरु आहे. स्वातंत्र्यदिनी भारत सरकारने हर घर तिरंगा अभियान सुरु केलं आहे. या निमित्ताने घरोघरी तिरंगा लावला जाणार आहे. शिवाय उद्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक ठिकाणी पदयात्रा देखील काढल्या जाणार आहेत. भारताच तिंरगा हाती घेत आणि भारत माता की जय घोषणा देणाऱ्या पदायात्रा उद्या पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या स्वातंत्र्यदिनानिमत्त रायगड जिल्ह्यातील खारघर येथे देखील पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा मार्गाने या भव्य दिव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून अविस्मरणीय अनुभव आणि देशभक्तीच्या उत्सवात नागिरकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलं आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की, ‘विकसित भारत’ वर लक्ष केंद्रित करून आपला भारत देश उद्या १५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. देशभरात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जात आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने हर घर तिरंगा अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खारघरमध्ये ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा मार्गाने या भव्य दिव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. या तिरंगा पदयात्रेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून देशभक्तीच्या उत्सवात नागिरकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे.

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, भारत सरकार नागरिकांना प्रत्येक घरात राष्ट्रध्वज आणि तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. या मोहिमेअंतर्गत तुम्ही भारताच्या तिरंग्या सोबत सेल्फी अपलोड केल्यास तुम्हाला हर घर तिरंगा सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. यंदा ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे तिसरे वर्ष आहे. २०२२ मध्ये प्रथमच आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button