महाराष्ट्र

मुख्यमंत्री मामा… आईला १५०० रुपये दिले, माझ्या सुरक्षेचं काय?; पुणे शहरातील बॅनर्सने वेधले लक्ष

पुणे : सध्या राज्यामध्ये बदलापूर प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर शाळेमध्ये अत्याचार करण्यात आल्यामुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या चार वर्षांच्या मुलींवर शिपाई नराधमानेने केलेल्या या कृत्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या घटनेवर आधारित पुण्यामध्ये पोस्टर लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मामा म्हणून हाक मारत चिमुकल्या मुलींनी सुरक्षेची मागणी केली आहे. पुण्यात एका चौकात हे पोस्टर्स लागले आहेत. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक आघाडीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी हे पोस्टर लावले आहे. गुरनानी यांचे नाव या पोस्टरवर आहे. या ब्लॅक ॲन्ड व्हाईट पोस्टरवर एक चिमुकली मुलगी दाखवली आहे. त्यावर मनाला भिडणारा असा घेणारा मजकूर लिहिला आहे. चिमुकल्या कळ्या उमलण्याआधीच कोमेजल्या. असे या पोस्टरवर लिहिले आहे. या पोस्टरमधील मुलगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मामा म्हणत आहे. तसेच सुरक्षेची मागणी करत आहे. आईला १५०० रुपये तुम्ही दिले. पण माझ्या सुरक्षेचं काय? मुख्यमंत्री मामा, महाराष्ट्राला लाडकी बहीण नाही, सुरक्षित बहीण योजना पाहिजे, असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. पुण्यातील हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून याची चर्चा सुरु आहे.

बदलापूरमध्ये झालेल्या प्रकरणावरुन पुण्यात देखील आंदोलने झाली आहे. राज्यात मुली सुरक्षित नसल्याची टीका सर्व विरोधकांनी केली आहे. पुण्यामध्ये आम आदमी पार्टीने देखील मुलींच्या सुरक्षेसाठी आंदोलन केले. कोरेगाव पार्क याठिकाणी आंदोलन करत राज्यात कायदा व सुव्यवस्था नसल्याचे म्हटले. त्याचबरोबर बदलापूर घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील एफ.सी. रोडवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये शरद पवार गटाने देखील आंदोलन छेडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button