महाराष्ट्र

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे  निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. देशासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा, शालिन उद्योगपती आपल्यातून गेला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा यांचं होतं.  टाटा उद्योगसमुहाचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी रतन टाटा यांच्या निधानाचे अधिकृत वृत्त दिले आहे.  ‘दोन दिवसांपासून मी रतन टाटा ज्या रुग्णालयात होते, तिथेच आहोत. त्यांना लवकरात लवकरच बरं वाटावं अशा प्रार्थना आम्ही करत होतो. आम्ही सगळ्यांनी त्यांच्यामध्ये देव पाहिला होता. माणुसकी काय असते हे त्यांनी दाखवून दिलं होतं’, अशी प्रतिक्रिया युवा उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी  दिली.

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून १९६७-६२ मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना  टाटा ग्रुपचं चेअरमनपद सोपवलं. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली. १९८८ मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पनाही त्यांना सुचली.  टाटांच्या मार्गदर्शनात २००८ मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी २०१२ मध्ये टाटा समूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा दिला आणि सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला. मेस्त्रीसोबतच्या वादानंतर २०१६ मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही ३ मुले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button