महाराष्ट्र

निवडणुकीच्या काळातील खर्चाच्या हिशोबांवर दक्षता आयोगाचे लक्ष

भाईंदर : आगामी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी निवडणूक निरीक्षक कुमार पुरुषोत्तम आणि निवडणूक खर्च निरीक्षक सुरेंद्र पाल सिंग यांनी ठाणे जिल्ह्यातील १४५ मीरा- भाईंदर विधानसभा मतदार संघास प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. तसेच विधानसभा रणधुमाळीत होणार्‍या निवडणुकीत उमेदवारांकडून होणार्‍या खर्चांवर दक्षता आयोगाने लक्ष द्यायचे आहेत, असे निर्देश दिले आहेत. मीरा -भाईंदर १४५ विधानसभा मतदार संघ भेटीत निवडणूक निरीक्षक कुमार पुरुषोत्तम आणि निवडणूक खर्च निरीक्षक सुरेंद्र पाल सिंग यांनी मतदार संघातील निवडणूक कामकाजास्तव कार्यरत स्ट्राँग रूम, कंट्रोल रूमची पाहणी केली. त्याच बरोबर एक खिडकी योजना पथक, खर्च निरीक्षक पथक, मनुष्यबळ पथक, नाके तपासणी पथक, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (एसएसटी), तपासणी नाके टिम, चित्रीकरण दक्षता टीम, भरारी पथक सह कायदा व सुव्यवस्था पथक, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग पथक, स्वीप पथक, प्रसार माध्यम पथक व बॅलेट  पेपर व मोर्क कॉपी पथक या पथकांची सविस्तर माहिती घेतली. निवडणूक खर्च निरिक्षकांनी खर्च निरीक्षक पथक आणि प्रसार माध्यम पथकास महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्याच बरोबर स्वीप पथकास लोकसभेपेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी या करीता विविध माध्यमातून जास्तीत जास्त मतदानाविषयी जनजागृती करण्याबाबत सूचना दिल्या.

सदर भेटीप्रसंगी निवडणूक निरीक्षक कुमार पुरुषोत्तम आणि निवडणूक खर्च निरीक्षक सुरेंद्र पाल सिंग यांच्यासह मीरा -भाईंदर, वसई- विरार पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, १४५ मीरा -भाईंदर मतदारसंघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश गौंड, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कल्पिता पिंपळे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार घरात, निवडणूक नायब तहसीलदार प्रदिप मुकणे आणि सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button