महाराष्ट्र

विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार

मुंबई : महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही (उद्धव ठाकरे) शुक्ला यांना पोलिस महासंचालकपदावरुन हटविण्यासाठी मागणी केली होती. त्यातच निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ल यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्यांच्या जागी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी त्यांची नेमणूक झाली आहे. त्यापूर्वी ते महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. ठाणे पोलिस आयुक्तपदावरुन मे २०२१ मध्ये त्यांची या ठिकाणी बदली झाली. याशिवाय, २०१६-१८ या कालावधीत फणसळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून पदभार सांभाळला होता. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाचेही ते प्रमुख होते.

काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी निवडणूक आयोगाला पत्र लिहून डीजीपी रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. पटोले यांनी त्यांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले होते. याचदरम्यान आता निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ल यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, मात्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत काँग्रेसकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. २० नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करण्याची विनंती काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. ते वादग्रस्त अधिकारी असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाला पत्रही पाठवले होते. जोपर्यंत ते या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणुका घेणे कठीण जाईल, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांची बदली होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button