नालासोपारा मध्ये भाजपच्या राजन नाईक यांचा बविआला धक्का…

विरार : निवडणुकी पूर्वी राज्याच्या नकाशावर आलेल्या नालासोपारा मतदार संघात बविआला मोठा धक्का बसला आहे.३ वेळा आमदार राहिलेल्या क्षितिज ठाकूर याना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.याठिकाणी भाजपच्या राजन नाईक यांनी क्षितिज ठाकूर यांचा ३० हजार मतांनी पराभव केला.
आज सकाळी नालासोपारा विधानसभेची मतमोजणी विरार येथील समर्थ इंटरनॅशनल शाळेत सुरू झाली निवडणुकीपूर्वी विरार मधील विवांत हाटेल मध्ये पैसे वाटण्याच्या आरोपावरून बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपचे दष्ट्रीय सचिव विनोद तावडे याना भिडले होते.त्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रा बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी पुलिसांचे 3 अडथळे पार करून जावे लागत होते.तर सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्या नंतर मतमोजणी मात्र संथ गतीने सुरू होती त्यामुळे निकाल येण्यास वेळ लागत होता
यावेळी मतमोजणी केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने मतमोजणी केंद्र बाहेर कार्यकर्ते जमल्याने चित्र दिसत नव्हते. नालासोपरात बविआच्या पराभवाला अनेक कारणे असली तरी प्रामुख्याने विवांत हॉटेल मध्ये झालेला राडा,नगरसेवकांचे दुर्लक्ष आणि निवडणुकीपूर्वी माजी महापौर राजीव पाटील यांची नाराजी भोवल्याचे समजते.यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत राजन नाईक हे क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढले होते त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता
“नालासोपारा मतदार संघात झालेला पराभव मान्य असून हा जनतेचा कौल स्वीकारला असून पुन्हा नव्या जोमाने काम करायला सुरुवात करणार” – क्षितिज ठाकूर
“हा विजय माझा नसून महायुतीचा असून विकासाचे व्हिजन घेऊन मी काम करणार आहे.माझा कोणावरही राग नसून आता विकासाचे काम करण्यावर भर देणार आहे.” – राजन नाईक ,भाजप विजयी उमेदवार
- नालासोपारा विधानसभेर ३० हजार १४९ मताधिक्याने भाजपचे राजन नाईक विजयी
- राजन नाईक ( भाजपा) १ लाख ३० हजार ४६५
- क्षितिज ठाकूर ( बाविआ) १ लाख ३१६
- संदीप पांडे ( काँग्रेस) ११ हजार ४३५
- धनंजय गावडे ( प्रहार) १० हजार ७४२


