महाराष्ट्र

वाहतुक पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवनियुक्त पोलीस कर्मचा-यास मिळाले हरवलेले कागदपत्र आणि गणवेश

ठाणे : नगर येथील रहिवासी असलेला नवनियुक्त पोलीस कर्मचारी सोमवारपासून ठाणे पोलीस दलात त्याचे कर्तव्य बजावण्यास सुरूवात करणार होता. परंतु त्यापूर्वीच त्याच्याकडील रूजू होण्याची, इतर महत्त्वाची कागदपत्र आणि गणवेशाची बॅग रिक्षात विसरला. परंतु वाहतुक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत ही बॅग त्याला पुन्हा मिळाली. बॅग मिळताच कर्मचाऱ्याचा जीव भांड्यात पडला. नगर येथील श्रीगोंदा भागात दत्तात्रय शिंदे हे राहतात. त्यांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून ते ठाणे पोलीस दलात सोमवारपासून रूजू होणार होते. मागील अनेक वर्षांपासून पोलीस होण्याचे स्वप्न आता साकार होणार होते. त्यामुळे दत्तात्रय आणि त्यांचे कुटुंबिय आनंदात होते. सोमवारी हजर व्हावे लागणार असल्याने ते रविवारी ठाण्यात आले होते. त्यांच्या ठाण्यातील नातेवाईकांकडे ते वास्तव्य करणार होते. रविवारी सायंकाळी ते रेल्वेने ठाणे स्थानकात आल्यानंतर त्यांनी स्थानक परिसरातील रिक्षा थांब्यावरून धर्मवीर नगर येथे जाण्यासाठी रिक्षा प्रवास सुरू केला. परंतु रिक्षातून उतरल्यानंतर त्यांची बॅग त्या रिक्षात राहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button