जीवनशैली

कॅन्सरचा धोका कमी होण्यासाठी टोमॅटोपासून ब्रोकोलीपर्यंत हे आहेत १० सुपरफूड्स

जागतिक कॅन्सर दिन (World Cancer Day 2023) ४ फेब्रुवारीला साजरा केला जातो.

 

लोकांमध्ये कॅन्सर या रोगाविषयीची जागरुकता वाढावी आणि त्याच्या उपचाराविषयी तसेच नियंत्रणाविषयी लोकांना माहिती दिली जावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा १० सुपरफूडविषयी (Superfood) माहिती सांगणार आहोत जे कॅन्सर (Cancer) कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

> अक्रोड
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते. हा प्रोटीनचा खूप चांगला स्त्रोत आहे. ब्रेस्ट कॅन्सरला थांबवण्यासाठी अक्रोड सगळ्यात जास्त उपयुक्त आहे.

> जांभूळ
जांभूळ म्हणजे ब्लूबेरीमध्ये अनेक फायटोकेमिकल्स आणि पोषक तत्व असतात. कॅन्सरचा प्रभाव जांभळामुळे कमी होतो. डीएनएचं नुकसान कमी करण्यासाठी जांभूळ फायदेशीर ठरणारं फळ आहे.

> टोमॅटो
टोमॅटोमध्ये लायकोपीन नामक एक फायटोकेमिकल आढळते. जो प्रोटेस्ट कॅन्सरचा धोका कमी करते. इतकंच नाही तर यात व्हिटॅमिन सी, जैविक सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटेशियम, मॅग्नेशियम आणि सल्फरदेखील आढळते.

> हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी, चाकवत अशा हिरव्या पालेभाज्या कॅन्सरशी लढा देण्यात उपयुक्त ठरतात. कारण यात फायबर आणि फोलेट असतं जे नवीन कोशिका तयार करण्यात उपयुक्त ठरते.

> गाजर
गाजर बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन आणि अनेक पोषकतत्वांनी युक्त असते. हे एक प्राकृतिक कीटनाशक आहे. कॅन्सर विकसित होण्यापासून थांबवण्यास गाजर उपयुक्त ठरते.

> धान्य
राजमा, हरभरे, नाचणी अशा धान्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन आणि खनिज याचे प्रमाण जास्त असतो. यात सॅपोनिन असते जे कॅन्सर कोशिका वाढण्यापासून रोखते.

> ब्रोकोली
ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर अशा भाज्यांमध्ये ग्लूकोसिनोलेट्स नावाचं रसायन असतं, जे कॅन्सरची जोखीम कमी करतं.

> हळद

हळदीमध्ये मॅग्नीशियम, पोटॅशियम, आयर्न, व्हिटॅमिन बी ६, ओमेगा ३, ओमेगा ६ फॅटी ॲसिड और अँटीसेप्टिक गुण असतात जे कॅन्सरपासून बचाव करतात. कॅन्सरवरच्या अनेक औषधांमध्ये याचा औषध म्हणून वापर होतो.

> सोयाबीन
सोयाबीनमध्ये आयसोफ्लेवोन्स नावाचे एक फायटोन्यूट्रिएंट्स असतात, ज्यांचा वापर केल्याने कॅन्सरच्या कोशिकांना वाढण्यापासून थांबवता येते.

> कारलं
एका रिपोर्टनुसार, कारलं शरीरातील कॅन्सर सेल्सची वाढ थांबवतं.एका रिसर्चनुसार कारलं कॅन्सर ट्यूमरला साधारण ५० % पर्यंत वाढण्यापासून थांबवतं. त्यामुळे कॅन्सर पेशंट्सनी आहारात कारल्याचा समावेश जरुर करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button