जीवनशैली

जास्त नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ पण आहेत दुष्परिणाम

हे प्रत्येकाला माहिती आहे, नारळ पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक महत्त्वपूर्ण घटक मिळतात.

आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरदेखील नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण नारळ पाणी प्रत्येक व्यक्तीसाठी चांगलं ठरले असं नाही. कारण नारळ पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते. नारळ पाणी प्यायल्याचे जेवढे फायदे आहेत तेवढंच ते हानीकारक देखील आहे. नारळ पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला पोटॅशियम मिळतं. पण पोटॅशियमचं प्रमाण जास्त झाल्यास तुम्ही आजारपणाला निमंत्रण देतात.

अर्धांगवायूचा धोका! (Paralysis)

नारळाच्या पाण्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅंगनीजसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्याची मर्यादित मात्रा शरीरासाठी चांगली असते. मात्र जर तुम्ही नारळ पाण्याचं अतिसेवन केल्यास शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढतं. त्यामुळे अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते.

लूज मोशनचा त्रास (Loose motion)

नारळाच्या पाण्यात मोनोसॅकेराइड्स, किण्वन करण्यायोग्य ऑलिगोसॅकराइड्स आणि पॉलीओल्स असतात. शरीरात या घटकांचं प्रमाण वाढलं तर ते शरीरातील पाणी शोषून घेण्यास सुरुवात करतात. त्यामुळे अनेकांना जुलाब, उलट्या-जुलाब, गॅस-आम्लता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकांना नारळ पाणी प्यायल्यामुळे अँसिडीटीची (Acidity) समस्या होते. त्यामुळे अशा लोकांनी कधी तरी नारळ पाणी प्यायला हवं.

मधुमेह रुग्णांसाठी हानीकारक (Diabetes)

ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी जास्त नारळ पाणी पिऊ नये. त्यात साखर आणि उच्च कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वेगाने वाढू लागतं. तुम्हालाही नारळाचं पाणी प्यायचं असेल तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

कमी रक्तदाबाची समस्या (Low blood pressure)

नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्याने ते जास्त प्रमाणात घेतल्याने आपल्याला शरीराचं नुकसान होऊ शकतं. शरीरातील रक्तदाबाची पातळी घसरते आणि तुम्हाला चक्कर येतात. त्यामुळे लो बीपी असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नारळचं पाणी पिऊ नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button