गुन्हे

कोंढवा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ५ वर्ष फरार असलेला आरोपीला केले गजाआड

सराईत गुन्हेगारावर आहेत जबरी चोरी, दरोडा, खून असे गुन्हे दाखल

पुणे गुन्हे वार्ता : जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाच वर्षे फरार असलेल्या आरोपीला कोंढवा पोलिसांनी शिताफिने अटक केली आहे. आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील माढा येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात  गंभीर गुन्हे दाखल आहेत. अविनाश धनाजी शिंदे (रा. सुंदरनगर, मांगडेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोंढवा पोलिसांकडून फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना कोंढवा पोलीस ठाण्यातील दोन आणि रायगड पोलीस ठाण्यातील  एका जबरी गुन्ह्यत पाच वर्षे फरार असलेल्या आरोपीला माढा येथून अटक केली. फरार आरोपीचा शोध घेत असताना आरोपी माढा तालुक्यातील उंदरगाव येथे शेतात मजूरीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माढा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.

आरोपी एका शेतात मजुरीचे काम करत होता. तसेच शेतात असणाऱ्या घरात राहत असल्याचे दिसून आले. कोंढवा पोलिसांनी त्याला शिताफिने अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर भारती विद्यापीठ, वाकड, कोंढवा, राजगड पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, खून, शरिराविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे ,
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रागसे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button