गुन्हे

पुणे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी शहरातील २ अट्टल गुन्हेगारांना केले तडीपार

पुणे गुन्हे वार्ता : पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहरच्या स्मार्तना पाटील यांनी गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या दोन गुन्हेगारांना हद्दपार केले आहे.

पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलिस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, जबरी चोरी करणे, चैन चोरी करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत करणे, शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधीत पोलिस स्टेशन कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पुर्ण करुन खालील नमुद ०२ गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार आदेश केलेले आहेत.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे सनी संजय सपकाळ (वय २४ वर्षे, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क, पुणे) व भारती विदयापीठ पोलिस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे मिथुन भरत बिरामणे (वय २५ वर्षे, रा. स.नं.१८, अष्टविनायक नगर, आंबेगाव पठार, पुणे) यांचा समावेश आहे.

सदर कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, राजेंद्र डाहळे, अपर पोलिस आयुक्त, प.प्रा.वि., पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आलेली आहे. यापुढील काळात देखील पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२ हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे, असे पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहरच्या स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button