महाराष्ट्र

आमदार संजय शिरसाट यांची पंतप्रधानांकडे मागणी ‘छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर हटवा’

त्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्यांच्या आंदोलनाविरोधात भाजप – शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. इम्तियाज जलील यांच्या आंदोलनावर आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. जलील यांचे आंदोलन नाही तर बिर्याणी पार्टी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच औरंगजेबाची कबर औरंगाबादमधून हटवा, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली.

संजय शिरसाट पुढे म्हणाले, हा वाद नेमका कशामुळे होतो आहे, तर औरंगजेबाच्या कबरीमुळे त्यामुळे त्याची कबर इथून काढा ही आमच्या सहकाऱ्यांची मागणी रास्त आहे. मी देखील याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही कबर इथून काढा, अशी मागणी करणार आहे. औरंगजेब आणि या शहराचा काहीही संबंध नव्हता. औरंगजेब येथे येऊन गेला असेल, पण त्याचा मृत्यू इथे झाला नाही. त्यामुळे त्याची कबर हटवलीच पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.

इम्तियाज जलील यांच्या आंदोलनावर टीका करताना शिरसाट म्हणाले, जलील आणि त्यांचे सहकारी या
शहराचे वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. बिर्याणी खाऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.
हे त्यांचे कोणतं उपोषण आहे? मी या संदर्भात पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे.

आमच्या लोकांवर जो अत्याचार झाला आहे. त्यातून मुक्ती देण्याचे काम आम्ही करत आहोत आणि यात अशा
प्रकारे कोणी निझाम येऊन आमच्यावर दादागिरी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,
असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button