महाराष्ट्र

UPI च्या माध्यमातून पेमेंट करताना या चुका करु नका

मुंबई : भारतात युनिफाइड पेमेंट इंटरफेस ( UPI ) माध्यमातून व्यवहार खूप वेगाने वाढत आहेत. फोन हातात घेतला की काही सेकंदात पैसे ट्रान्सफर. मग बिल भरणे असो किंवा काही खरेदी किंवा तिकीट बुक करणे असो.

या सर्व कामांसाठी आता UPI अँपचा वापर केला जातो. ऑनलाईन सुविधा वाढल्या आहेत. पण त्यासोबत आर्थिक फसवणूकही झपाट्याने वाढली आहे. सायबर गुन्हे वाढत आहेत. लोकांची फसवणूक करण्याचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. ज्याला लोकं बळी पडत आहेत. मुंबईतून असाच एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

मुंबईत ८१ जणांची १ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं पुढे आले आहे. नुकत्याच आलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. सायबर ठग लोकांची फसवणूक करतात. त्यानंतर त्यांच्या पैशांवर डल्ला मारतात. मुंबईतील ८१ लोकांच्या खात्यातून तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

सायबर ठग सुरुवातील UPI द्वारे लोकांच्या खात्यात काही पैसे पाठवतात. यानंतर ते लोकांना फोन करून पैसे चुकून पाठवल्याचे सांगतात आणि त्यांना ते परत करण्याची विनंती करतात. जर तुम्ही त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले तर तुमच्या बँकेचे सर्व तपशील जसे की KYC संबंधित माहितीसह तुमचा पॅन आणि आधार तपशील देखील त्यांच्यापर्यंत पोहोचतात. यासाठी सायबर ठग एक प्रकारचे मालवेअर वापरतात. त्यानंतर ते तुमचे बँक खाते पूर्णपणे हॅक करून ते त्यांच्या ताब्यात घेऊ शकतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button